जतच्या दोन्ही विजयी उमेदवारांचे जंगी स्वागत

0
डफळापूरचे बाहुबली नेते मन्सूर खतीब यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत विजयी झाल्यानंतर जंगी मिरवणूक काढण्यात आली.
डफळापूरचे बाहुबली नेते मन्सूर खतीब यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत विजयी झाल्यानंतर जंगी मिरवणूक काढण्यात आली.
जत,संकेत टाइम्स : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकी विजयी उमेदवार प्रकाश जमदाडे व मन्सूर खतीब यांचे जत तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले.धक्कादायक निकालाची नोंद केलेले प्रकाश जमदाडे यांची जत शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 

 

 

मुख्य चौकातील हनुमान मंदिरासमोर विजयी सभा झाली.विविध ठिकाणी सत्कार करण्यात आले.यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.तर मन्सूर खतीब यांची डफळापूर येथे जंगी मिरवणूक काढण्यात आली. मुख्य बाजार पेठेतून जिपमधून गुलालाची उधळण करत मुख्य बाजार पेठ,स्टँड व बुवानंद मंदिरापर्यत मिरवणूक काढण्यात आली.

 

विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांना पराभूत करून जायंट किलर ठरलेले प्रकाश जमदाडे यांचा जतेत जंगी स्वागत करण्यात आले.

 

फटाक्याची आतषबाजीने जल्लोष करण्यात आला. खतीब यांच्या कार्यालयात विजयी सभा झाली. यावेळी विविध मान्यवरांनी सत्कार केले.यावेळी जे के माळी,शंकर गायकवाड,सज्जन चव्हाण,भारत गायकवाड उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.