डॉ.सार्थक हिट्टी यांना ‘मेडिकल आयकॉन 2021’पुरस्कार प्रदान 

0
3
माडग्याळ : माडग्याळ येथील डॉ.सार्थक हिट्टी यांना मेडिकल आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नात असणाऱ्या ग्रुप आँफ मिडिया आणि स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त सोमवारी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यग्रहात राज्यातील वैद्यकीय, कृषी, सहकार, पत्रकारिता, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय आदी क्षेत्रात आदर्शवत काम करणाऱ्या गुणीजणांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आ.गोपीचंद पडळकर, आ. मानसिंगराव नाईक,सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, वैभव शिंदे,हभप तुकाराम बाबा, झुंझाराव पाटील, संग्रामसिंह पाटील,रणजित झपाटे, बाळासाहेब पाटील,देवानंद माळी,स्नेहा माळी, विराज शिंदे, दिलीप वग्याणी, विशाल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

 

 

 

जत तालुका तसा दुष्काळी तालुका,
या तालुक्यातील दुष्काळानेही अनेक हिरे तयार केले आहेत.आपल्या अपार बुध्दी,अनुभव,शिक्षणांने या हिऱ्यांनी तालुक्याचे नाव उंचीवर नेहले आहे.त्यां हिऱ्यापैंकी एक नाव म्हणजे माडग्याळ येथील स्ञीरोग तज्ञ डॉ.सार्थक हिट्टी हे होत.माडग्याळ गावास डॉ.सार्थक हिट्टी यांच्या रुपाने वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान,युवा तसेच सामाजिक जाण असणारे व्यक्तीमहत्त्व लाभले आहे.

 

 

वडील डॉ.शेखर हिट्टी व आई सौ. शिवमाला हिट्टी हे माडग्याळमध्ये गेली 30 वर्षे आपली सेवा बजावत आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉ.सार्थक हिट्टी यांनी आपले वैद्यकीय कार्य सुरू केले आहे.माडग्याळ सारख्या गावातून डॉ.सार्थक हिट्टी यांनी प्राथमिक शिक्षणानंतर पुढील उच्च शिक्षण,व वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले आहे.

 

अंधेरी मुंबई येथील कुपर हॉस्पिटलमधून त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली.कोरोना सारख्या महामारीत मोठ्या धाडसाने त्यांनी रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली आहे.
सध्या डॉ.सार्थक हिट्टी हे माडग्याळ येथे स्त्री रोगतज्ञ स्पेशालिस्ट म्हणून कार्य करीत आहेत. कोवीडच्या काळामध्ये  अगदी कोवीड पॉझिटिव्ह महिलांचे बाळंतपण त्यांनी स्वतः धाडसाने आणि जबाबदारीने पार पाडले आहे.

 

ग्रामीण भागामध्ये रुग्णांची अगदी जबाबदारीने काळजी घेत असताना त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व अल्ट्रा साऊंड सेंटर ही चालू केलेले आहे.त्यामुळे रूग्णांचा बराचं वेळ वाचत आहे.

 

त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रुप ऑफ मीडिया आणि स्वराज्य न्यूज चँनल यांच्यातर्फे देण्यात येणारा मेडिकल आयकॉन 2021 हा पुरस्कारांने त्यांना  गौरवण्यात आले,डॉ.हिट्टी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
माडग्याळ ता.जत येथील डॉ.सार्थक हिट्टी यांना ‘मेडिकल आयकॉन 2021’हा पुरस्कार विविध मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here