सांगोला: महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राज्यभरात माझी वसुंधरा अभियान २.० व केंद्रशासनाच्या नगरविकास अभियान संचालनालय मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियान राबवले जात आहे. सदरील अभियानामध्ये पृथ्वी, जल, वायू ,आकाश,अग्नी या पंच तत्वावर आधारित असून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत मा. जिल्हाधिकारीसो यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला नागरपरिषदेमार्फत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियान प्रभावीपणे पार पडण्यास मदत झाली.
सांगोला नागरपरिषद सांगोला येथील आरोग्य विभागातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी, याबरोबरच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,अकॅडमिक डीन टी एन जगताप सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.