जत,संकेत टाइम्स : जतमधील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.सौ.सरिता शालिवाहन पट्टणशेट्टी यांना 104 माय एफएम चा “वुमन डॉक्टर पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून जत तालुक्यातील चिमुरड्यांची सेवा करणाऱ्या मयुरेश्वर हॉस्पिटलच्या डॉ.सौ.सरिता शालिवाहन पट्टणशेट्टी यांना जत तालुक्यातील पहिली महिला बालरोगतज्ञ व मल्टी टॅलेंटड वुमन डॉक्टर असा पुरस्कार काल सांगली येथे ग्रेट मराठा हॉटेलमध्ये सुप्रसिद्ध मराठी कलाकार शंतनु मोघे (शिवाजी, संभाजी सिरियल मधील) यांच्याहस्ते देण्यात आला.104. My FM रेडिओ चॅनलचा पाचवा वर्धापन दिनानिमित्त हे पुरस्कार देण्यात आले. त्यानिमित्त सांगली, कराड, व कोल्हापूर मिळून तीन जिल्ह्यातील 27 महिला डॉक्टरांना त्यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल तसेच त्यांनी केलेल्या समाज कार्याबदल हा पुरस्कार देण्यात आला.
जत तालुक्यातून डॉ.सौ.सरिता शालिवाहन पट्टणशेट्टी यांची निवड करण्यात आली.१९९७ पासून डॉ.सौ.सरिता पट्टणशेट्टी यां बालरोग तज्ञ म्हणून मयुरेश्वर हॉस्पीटल मध्ये काम करतात.मेंदुज्वर, मेंदूचा टिबी, फिट किंवा झटक्याचे आजार यात त्यांचा विशेष अनुभव आहे.तसेच विंचू चावने, निमोनिया, डेंगू ताप अशा अनेक दुर्धर आजारांवर त्यांनी आतापर्यंत यशस्वी उपचार केले आहेत त्यांनी आतापर्यंत समाज-प्रबोधनार्थ ७०० ते ८०० व्याख्याने दिली आहेत.दरवर्षी विवेक बसव प्रतिष्ठान अंतर्गत त्या वृक्षारोपण करित असतात.
जत येथील सरिता शालिवाहन पट्टणशेट्टी यांना 104 माय एफएमचा “वुमन डॉक्टर पुरस्कार” प्रदान करण्यात आला.