काका गावातील राजकारणातही काका सक्रीय होते, ते स्व:ता सोसायटीचे सलग 35 वर्ष सदस्य होते,सोसायटीचे व्हा.चेअरमन, ग्रा.पं.सदस्य म्हणूनही त्यांनी राजकारणात उपलब्धता दाखविली होती.त्यांच्या मोठ्या सुनबाईना जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काकांनी निवडून आणले होते.त्यांच्या मोठ्या कुंटुंबातील एकतरी सदस्य ग्रामपंचायतीत असतोच.गावातील निवडणूकीत त्यांच्या शंब्दाला मोठे वलयं होते.ते जिकडे असायचे त्यांच्या पक्षाची सत्ता ग्रामपंचायतीवर असायची.
डफळापूर येथील साधे,दानसूर व्यक्तीमहत्व म्हणून काकांची गावात ओळख आहे.त्यांनी गावातील मंदिरे,सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम,गरजवंताना सढळ हाताने मदत करत असत.ते राहत असलेल्या परिसरातील पन्नासवर कुंटुबातील प्रत्येक सुख,दु:खाच्या घटनेत काकांचा पुढाकार असायचांच,त्यांच्या सल्ल्या शिवाय कार्यक्रम होत नसतं.
विजार,शर्ट,होंडा कंपनीची अगदी जूनी दुचाकी असा पेहराव काकांच्या साधेपणांची साक्ष देते.गावातील स्टँड लगत नातू महेशच्या कृषी दुकानातील कट्ट्यावर काकांची बैठक असायची.तेथे अनेक शेतकरी,राजकीय नेते,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील लोक कांकाना भेटायचे.अशा सामाजप्रिय लोक हिच आपली श्रींमती माननाऱ्या संभाजी काका माळी यांचे कार्य अनेक नव शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे.
स्व.संभाजी काका यांच्या कार्याची काही छायाचित्रे,