दुचाकी वाहनांकरिता नविन मालिका 3 जानेवारी पासून सुरू

0

 

सांगली : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 डी यु ही नवीन मालिका सोमवार, दि. 3 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली यांच्यातर्फे देण्यात आली.

 

एमएच 10 डी यु नवीन मालिका दि. 3 जानेवारी 2022 रोजी दुचाकी वाहनांकरिता सुरू होत असून या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या ठिकाणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

 

पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5 (अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत – आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. सदरचे पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे.

Rate Card

 

एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 4 जानेवारी 2022 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.