स्व.पतंगरावजी कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवली ; आ.विक्रमसिंह सांवत

0
जत : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त व कृषीराज्यमंत्री ना. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम फौंडेशन,जतच्या वतीने जत तालुक्यातील तिल्याळ, असंगी, जत, गोंधलेवाडी, संख, भिवर्गी, मोरबगी, माणिकनाळ, अक्कळवाडी, गिरगाव, लवंगा, गूळगुजनाल, कोणते बोबलाद, कोणबगी, करेवाडी को. बो., करेवाडी ति.को.येथील शालेय विद्यार्थ़्यांना आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते वह्याचे वाटप केले.

 

यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील,मारूती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्व. पतंगरावजी कदम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण आहे. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा त्यांनी दारोदारी पोहोचवली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत ना.विश्वजीत कदम मार्गक्रमण करीत आहेत. शिक्षणाची विचारधारा आणखी सक्षम करण्यासाठी आज जत तालुक्यामध्ये वही वाटप करण्यात आले,असे यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.