थकित कर्ज भरून सोसायटी व बँकेला सहकार्य करावे : प्रकाश जमदाडे

0
जत :  जत येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, सांगली शाखा मार्केट यार्ड येथील सभागृहात तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन ,व्हा.चेअरमन ,सेक्रेटरी व बँकेचे अधिकारी यांचे
उपस्थितीत आढावा बैठक घेणेत आली.त्यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, जेष्ठ
नेते बसवराज पाटील,माजी सभापती सुरेशराव शिंदे,संचालक प्रकाश जमदाडे,मन्सुर खतीब,भैय्या
कुलकर्णी ,आप्पासाहेब नामद ,शिवाप्पा तावशी ,रामाण्णा जिवाणावर देवगोंडा बिरादार उपस्थित होते.

 

 

तालुक्यात ८२ सोसायट्या असुन १६ सोसायट्याकडे जवळपास ४२.०० कोटी थकाबाकी आहे ,त्यापैंकी १० संस्था अतिशय चांगल्या आहेत.५ संस्थाची बॅक पातळीवर १०० टक्के वसुली आहे व एका संस्थेची मेबर पातळीवर १०० टक्के वसुली आहे.शेतकरी हा केंद्र बिंदु धरून सर्व फिल्ड ऑफिसर व सचिव यांनी काम करणेचे आहे.थकबाकीदार नसणारे शेतकरी व योग्य कारणासाठी मागणी असेल तर अशी प्रकरणे त्वरीत मुख्य कार्यालया कडे पाठवावीत.चांगल्या शेतक-याची आडवणुक होऊ नये,अशा
सुचना दिल्या.

 

प्लॉन करावा अशी सुचना केल्या.सभासदानी ही कर्ज घेणे बरोबरच कर्ज भरणेसाठी ही पुढे यावे,कर्ज प्रकरण मंजुरी मध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही,याची ग्वाही दिली.गेल्या १५ दिवसात ८२ सोसायट्याना भेट देऊन आभार दौ-याच्या वेळी सभासदाकडुन ज्या सुचना आल्या होत्या. त्याचा पाठपुरावा करत त्या सोसायट्याना सुचना सोडविण्याचे काम प्रकाश जमदाडे व मन्सुर खतीब यांनी केले असल्याचे सांगितले.
बँकचे धोरणे हे शेतक-यांचे हिताचे असेल,संस्थेची वसुली न पाहता सभासद सक्षम असेल व यापुर्वी थकबाकीदार नसेल त्या सभासदाला कर्ज पुरवठा करण्यात यावा अशी कर्ज प्रकरणे मुख्य कार्यालयास पाठवावीत यापुढे महिन्यातुन २ वेळा सचिव व बँक अधिकारी यांची बैठक घेऊन अडचणी निवारण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले,जत तालिक्यातील शेतक-यांच्या हिताचा कारभार दोन्ही ही संचालकानी करावा. यावेळी सुरेशराव शिंदे,बसवराज पाटील यांनी मनोगते व्यक्त केली., सचिव संघटना व बँक अधिकारी यांचे वतीने सर्व मान्यवराचे सत्कार करण्यात आले.स्वागत तालुका विभागीय अधिकारी आर.टी.कोळी यांनी केले,तर आभार शाखाधिकारी तानाजी काशीद यांनी मानले
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.