सांगली जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा 10 जानेवारी पासून बंद ; डॉ. अभिजीत चौधरी

0
4

सांगली : राज्यात तसेच सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा दि. 10 जानेवारी 2022 पासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिले आहेत.

      

 

सदर बंद ठेवण्यात आलेल्या इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबत जिल्हा परिषद व महानगरपालिकेकडील शिक्षण विभाग यांनी सर्व शाळांना त्यांच्या स्तरावरून कार्यप्रणालीबाबत स्वतंत्र सूचना / निर्देश निर्गमित करावेत. तसेच शासनाने परवानगी दिलेल्या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांनी आरोग्य विभागाशी समन्वय साधून  योग्य ते नियोजन करावे व लसीकरण पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी.

 

जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी जे वर्ग सुरू राहणार आहेत त्या वर्गासाठी आपल्या स्तरावरून कोविड-19 प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन करण्याबाबत स्वतंत्र सूचना निर्गमित कराव्यातअसे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here