जतच्या विकासात पत्रकारांचा वाटा सिहांचा ; तुकाराम बाबा महाराज

0

 

माडग्याळ, संकेत टाइम्स : दुष्काळी जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न असेल की भयावह दुष्काळ सत्ताधारी व विरोधक यांना कायम जागृत ठेवून हा विषय सातत्याने तेवत ठेवला आहे. जतच्या विकासात तालुक्यातील पत्रकारांचा वाटा हा सिंहाचा आहे हे मान्यच करावा लागेल असे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

 

 

जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, रासपचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब थोरात, मानव अधिकार संघटनेचे संजय धुमाळ, ज्येष्ठ पत्रकार दत्ता सावंत, जत तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुनील घाडगे यांची उपस्थिती होती.

 

 

तुकाराम बाबा महाराज म्हणाले, विस्ताराने मोठा असलेल्या या तालुक्यात अनेक प्रश्न आहेत. जतचे हे प्रश्न पत्रकारांनी प्रामुख्याने मांडल्याने जतच्या विकासाला गती मिळाली हे मान्यच करावे लागेल. जतचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.

 

 

Rate Card

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अजित पाटील यांनी सोशल मीडियाच्या या जमान्यात जतच्या पत्रकारांनी एक वेगळी ओळख ठेवली आहे. बातम्यांची विश्वासहर्ता जपण्याबरोबरच विकासाच्या बातम्यांना प्राधान्य देत असल्याबद्दल कौतुक केले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता सावंत, संजय धुमाळ यांच्यासह पत्रकार बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

जत- तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते जत तालुक्यातील मधील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.