बँका अर्थकारणाच्या विकासाच्या केंद्रबिंदू ; माजी आमदार विलासराव जगताप

0

जत,संकेत टाइम्स :बँका या अर्थकारणाच्या विकासाच्या केंद्रबिंदू आहेत.त्यामुळे बँकांनी व खातेदारांनी आपली विश्वासार्हता जपली पाहिजे. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी शेगाव येथे व्यक्त केले.

 


जत तालुक्यातील शेगाव येथील शिवशंभो मल्टीस्टेट निधी लिमिटेड या बँकेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार बोलत होते.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे,माजी सभापती सुरेश शिंदे सरकार,प्रभाकरभाऊ जाधव, सरपंच सौ. सुनीता महादेव माने, रामचंद्र बोराडे दत्तात्रय बोराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ कांचनताई बोराडे,चेअरमन लक्ष्मण बोराडे, प्रदीप रासनकर, शहाजी बोराडे, गणपतराव बोराडे ,शहाजी गायकवाड, राजमाता पतसंस्थेचे चेअरमन शंकराव वगरे,सांगली जिल्हा ऑडिटर संघटनेचे अध्यक्ष सतीश भोसले,युवा नेते नाथा पाटील,डॉ.नदाफ , सर्व ग्रामपंचायत सदस्य व सभासद उपस्थित होते.

 

 

माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की ग्रामीण भागात बँका या अर्थकारणाच्या विकासाचा केंद्रबिंदू असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली विश्वासार्हता जपत आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. पतसंस्था व इतर सहकारी संस्था, इतर आर्थिक संस्थांचे ऑडिटबाबत ही पारदर्शकता असली पाहिजे.

 

 

Rate Card

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे म्हणाले की बँका या सर्व सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.खातेदार सभासद, कर्जदार यांनी बँकांना सहकार्य करावे. बँकेकडून ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू.

 

माजी सभापती सुरेश शिंदे म्हणाले की, बोराडे सर यांनी शेगावसारख्या ग्रामीण भागात निधी बॅंकेच्या रुपाने सर्वसामान्य नागरिकांसाठी चांगली सेवा दिली आहे.सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या बँकेचा निश्चितच फायदा सर्वांना होईल.

 

यावेळी शंकर मोरे,राहुल मोरे, शहाजी गायकवाड,स्वप्नपूर्तीचे चेअरमन सूर्यवंशी, विजय कदम,सर्व सभासद खातेदार उपस्थित होते.तसेच चंद्रकांत शिंदे, भारत शिंदे, कैलास गुरव, सौ सीमा कावळे, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते. आभार लवकुमार मुळे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.