शिर्डी ,संकेत टाइम्स : परिवारासाठी प्रत्येकाचा संघर्ष अगदी पोटतिडकीने चाललेला असतो, ही जगाची रीत आहे. मात्र समाज्याचे दुःख पाहून ते दूर करण्यासाठी खऱ्या सचोटीने जे प्रामाणिक प्रयत्न केले जातात. त्यातून समाज हा समृद्ध होत असतो, अशा कार्याचा बहुमान हा जीवन गौरव पुरस्काराने केला जात असल्याची भावना मा. आमदार तथा अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली.
ते शिर्डीतील हॉटेल साई गोल्ड इन् येथे रविवारी बिजनेस एक्सप्रेस श्री. फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरणाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते. व्यासपीठावर खा. सदाशिव लोखंडे, श्री फाउंडेशनचे ए. आय.मुजावर, साई संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, बाबासाहेब कोते, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी ग्रीन एन क्लिनचे अध्यक्ष अजित पारख यांना बिजनेस एक्सप्रेस श्री. फाउंडेशन या संस्थेचा २४ व्या. राज्य स्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए. आय. मुजावर यांनी केले.
पुढे शिंदे आपल्या भाषणात म्हणले की, चाकोरीच्या बाहेर जाऊन समाज्याचे कार्य केले पाहिजे हेच कार्य अजित पारख हे केमिस्ट संस्थेसोबत करत आहे. आणि हेच कार्य शिर्डीच्या पर्यावरण, स्वच्छतेसाठी केले आहे. या माध्यमातून फॅमिली हेल्थ गार्डन ही संकल्पना रुजविण्याचे काम सूरु आहे. शिरडी परिक्रमेच्या माध्यमातून शरीर समृद्धीचे काम केले जात आहे. सामाज्यासाठी इतके कार्य करतांना पुरस्कार मिळणे म्हणजे त्यांच्या परिवारासाठी हा सामाजिक सन्मान खूप मोठा होऊन जातो. त्यांच्या परिवारासाठी या पेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही. समाज्यातील कामामुळे समाधान मिळते, समाधानातून परमार्थ मिळतो. हाच परमार्थ परमानंद होत असतो,असे प्रतिपादन माजी आ. जगन्नाथ शिंदे यांनी केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर म्हणाले की, शिर्डीकरांना आणि आम्हाला अभिमान आहे. की अजित पारख यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मिळाला. व्यवसायाबरोबर बरोबर सामाजिक कार्य करणारा परिवार म्हणजे पारख परिवार आहे. शिर्डी नगर पंचायतीस स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा या मध्ये पारितोषिक मिळाले यामध्ये नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डोईफोडे, कर्मचारी, पदाधिकारी यांचे योगदान होतेच यापेक्षा सामाजिक संघटन म्हणून ग्रीन एन क्लिनचे ही योगदान महत्वपूर्ण होते. यासाठी खरे प्रयत्न अजित पारख यांनी केले. आता नगर पंचायत लवकरच वृक्ष गणना करत आहे. येत्या काळात लवकरच परिक्रमा मार्ग विकसित करण्याचा ठराव आम्ही घेतलेला आहे. त्याची रूपरेषा ठरविण्याचे काम सूरु आहे. या परिक्रमा मार्गात पथ मार्ग, प्रसाधन गृह करण्याचे आमचे नियोजन असल्याची नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली.
या प्रसंगी माजी नगरसेवक अँड. अनिल शेजवळ, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याचे सूत्र संचालन प्रा. विशाल तिडके यांनी केले तर आभार अरविंद महाराज मानले.
अजित पारख यांना मिळालेल्या पुरस्कारप्रित्यर्थ ग्रामस्थांच्यावतीने साई निर्माणचे ताराचंद कोते व पंकज लोढा, सोसायटीचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब कोते, माजी नगरसेवक नितीन शेळके यांनी सत्कार केला. या प्रसंगी संदीप पारख, विजय पारख, किशोर गंगवाल, सुधाकर शिंदे, दत्तात्रय कोते, अशोक कोते, नारायण लुटे, गोपीनाथ गोंदकर, गणेश दळवी, डॉ. स्वाधीन गाडेकर, हरीश थोरात ज्ञानदेव गोंदकर, डॉ. जितेंद्र शेळके, किशोर बोरावके, नरेश पारख, हर्ष पारख आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जीवन गौरव साई चरणी अर्पण – पारखसाई बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिर्डी ही आंतरराष्ट्रीय स्थरावर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे आम्हाला इथे काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आजचा सन्मान खरा साईबाबामुळे मिळाला आहे. त्यामुळे हा सन्मान साई चरणी अर्पण असलायची भावना पुरस्करार्थी अजित पारख यांनी व्यक्त केली.
फोटो ओळी
शिर्डी : येथे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार स्वीकारतांना अजित पारख समवेत खा. सदाशिव लोखंडे, मा. आ. जगन्नाथ शिंदे, ए. आय. मुजावर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, आदीसह ग्रामस्थ दिसत आहे.