खोजानवाडीत विश्वगुरु बसवण्णा यांचे मुर्तीचे अनावरण 

0
जत,संकेत टाइम्स : खोजनवाडी (ता.जत) बसव मंटप येथे कुडलसंगम येथील बसवधर्म पिठाचे चन्नबसव स्वामीजींनीनी विश्वगुरु बसवण्णा यांचे मुर्तीची बसव पूजा करून अनावरण करण्यात आले.

 

 

खोजानवाडी कुडलसंगम येथील बसवधर्म पीटाचे चन्नबसव स्वामीजींनीनी विश्वगुरुबसवण्णा यांचे मुर्तीची बसव पूजा करून अनावरण केले.
यावेळी मोठ्या प्रमाणात बसवभक्त उपस्थित होते. प्रार्थना वचन गायन व लिंगायत धर्माविषयी स्वामीजींनी प्रवचनपर मार्गदर्शन केले. लेंगरे ता.खानापूर जि.सांगली येथील बसवभक्त शरण भक्तराज ठिगळे यांनी विश्वगुरुबसवण्णा व लिंगायत धर्म यावर काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन चन्नबसव स्वामीजींच्या हस्ते झाले.

 

याठिकाणी दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. खोजनवाडी या गावात बसव मंटप येथे दररोज सकाळी,संध्याकाळी प्रार्थना, वाचन गायन, सामुदायिक इष्टलिंग पूजा आदी कार्यक्रम नित्यनेमाने चालतात. त्याचप्रमाणें गावात एकदेव उपासना प्रमाणे घरातील देव्हाऱ्यात फक्त विश्वगुरुबसवण्णा यांची मुर्ती असते.

 

खोजनवाडी हे गाव बसवधर्माकरीता एक आदर्श रोल मॉडेल गाव ठरले आहे. कुडलसंगम येथील बसवधर्मपीठ यांचे आदर्श विचारावर याठिकाणी वाटचाल चालते, नेहमी शरण धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी ,शरण तुकाराम माळी,शरण महादेव तेली ,शरण सदाशिव सिध्दरड्डी हे या गावातील भसवभक्ता बरोबर राहून बसतत्व सर्वत्र पोहचविण्यासाठी प्रयत्न करतात. बसवधर्मपीठ कुडलसंगम चे शरणाना एक वेगळा पवित्र अनुभव प्रत्येक वर्षी ११ ते १४ जानेवारी रोजी होणाऱ्या शरण मेळाव्यातून येतो.बसवधर्मपीठ कुडल संगमचे राष्ट्रीय बसवदल खोजानवाडी ता.जतचे अध्यक्ष एम.जी.काराजनगी सर हे सर्व याबाबत नियोजन करतात.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.