जत,संकेत टाइम्स : १४ जानेवारी मकर संक्रातीचे औचित्य साधत महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पंतगे यांनी सुमारे १३०० लोंकाना प्रत्यक्ष भेटून तिळगूळ देत मकर संक्रातीच्या शुभेच्छा देत आगळावेगळा उपक्रम राबविला.
मकर संक्रातीचे पारंपारिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला.
पंतगे यांनी जवळपास एक हजार लोकांना समक्ष भेटून तिळगुळ देण्याचा मानस केला व ते सकाळी सात वाजल्यापासून आपला मित्र परिवार नातेवाईक तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी,आरळी हॉस्पिटल मधील अधिकारी-कर्मचारी,पेशंट व त्यांचे नातेवाईक, माऊली हॉस्पिटल मधील कर्मचारी आणि पेशंट आणि त्यांचे नातेवाईक मंगळवार पेठेतील व्यापारी वर्ग,कामगार वर्ग पानपट्टीवाले,छोटे व्यवसायिक,फळे, भाजीविक्रेते यांना समक्ष भेटून तिळगुळ घ्या गोड बोला असा नारा देऊन सर्वांना गोड केले व हातात हात देऊन मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.आजच्या धावत्या युगात लोकांना आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवारांना समक्ष भेट देण्यास वेळ मिळत नाही.
त्यामुळे ते फोनवरून मोबाईल द्वारे व्हाट्सअप स्टेटस यावरून मकर संक्रातीच्या प्रत्यक्ष न भेटता एकमेकांना शुभेच्छा देतात,परंतु ही पद्धत फारच चुकीची वाटते या पद्धतीमुळे आप- आपल्यामध्ये न भेटल्यामुळे एक प्रकारचा दुरावा निर्माण होत चाललेला आहे,असे स्पष्ट चित्र समाजात दिसत आहे.ही पद्धत मोडून काढण्यासाठी या मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी हा उपक्रम राबविल्याचे दिनकर पतंगे यांनी सांगितले. सकाळी सात ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत त्यांनी जवळपास तेराशे लोकांना समक्ष भेटून मकर संक्रांती ची पारंपारिक पद्धत अवलंबली आहे.
या पद्धतीमुळे लोकांच्यात प्रत्यक्षात गाठीभेटी घेऊन आपला आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यामुळे या पतंगे यांचा आदर्श समाजातील इतर व्यक्तीने घ्यावा,अशी प्रतिक्रिया समाजामध्ये उमटत आहे.यासाठी समाजाने या पारंपारिक परंपरेचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करावा त्यासाठी थोडा वेळ द्यावा व इतर यांच्याशी हितगुज साधावे असे आव्हानही श्री.पतंगे यांनी केले.