तब्बल दोन तास रुग्णवाहिका मिळाली नाही | जत मधील प्रकार ; युवराज निकम,परशूराम मोरे यांच्यामुळे रुग्णाला दिलासा

0
जत : जत येथील ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.माडग्याळ येथील एक गर्भवती महिला शनिवार दि.१५ रोजी उपचारासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती.येथील डॉक्टरांकडून महिलेची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र तेथे 108 ही रुग्णवाहिका उपलब्ध असताना रुग्णवाहिका देण्यात विलंब करण्यात आला.

 

रुग्णवाहिका  उपलब्ध नाही ,असे सांगत सुमारे दोन तास या महिलेला ताटकळत बसण्याची वेळ आली.त्यामुळे नागरिकांतून शासकीय रुग्णालयाच्या या अनास्थेबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे.दरम्यान ही घटना समजताच विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम व जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे, संतोष भोसले, ग्रा. पं सदस्य योगेश एडके,सइसाब नदाफ,पांडुरंग सूर्यवंशी  आदींनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची विचारपूस केली.गर्भवती महिलेची आरोग्याच्या बाबतीत  इतके दुर्लक्ष का केले? असा सवाल करत  तेथील डॉक्टरांची चांगलीच कानउघाडणी केली.शेवटी सुमारे दोन तासानंतर रुग्णवाहिका उपलब्ध केली.

 

याबाबत विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम व जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे म्हणाले की,जत ग्रामीण रुग्णालयात आज एक गर्भवती महिला उपचारासाठी आली होती.पण तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे सांगण्यात आले. मात्र येथे १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होती. मात्र  ही रुग्णवाहिका उपलब्ध असताना ,उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.

 

 

एका गर्भवती महिलेच्या बाबतीत झालेला हा प्रकार अत्यंत चुकीचा व गंभीर आहे.तसेच १०२ रुग्णवाहिका ही केवळ गर्भवती महिलेच्या सेवेसाठी असताना ती उपलब्ध केली जात नाही.तसेच डॉक्टरांकडून या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण असल्याने सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.जत ग्रामीण रुग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.तसेच माडग्याळ येथील एक गर्भवती महिला उपचारासाठी दाखल करताना  रुग्णालयातील ज्या कर्मचाऱ्यांनी उपचाराबाबत चाल ढकल केली,त्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही निकम व मोरे यांनी केली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.