सांगली जिल्हा परिषदेसाठी नव्याने आठ मतदारसंघ वाढून 68 गट निश्चित

0
13

सांगली : जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी सादर केला. मतदारसंघ बदलणार असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. मतदारसंघातील लोकसंख्या, मतदारसंख्या आणि नकाशा यांचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेसाठी नव्याने आठ मतदारसंघ वाढून 68 गट निश्चित झाले आहेत. कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यांत प्रत्येकी मतदारसंघ वाढले आहेत.

 

मतदारसंघाची प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे.
मिनी मंत्रालयासाठी लवकरच धूमशान सुरू होणार असल्याने राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची
प्रारूप प्रभाग रचना तपासणी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात आहे.

 

सांगली जिल्हा परिषद प्रारुप रचनेचा आराखडा मुंबईत शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आला. महसूल उपजिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार उपस्थित होते. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 60 गट होते. जिल्ह्यातील वाढती मतदारसंख्या लक्षात घेता आठ मतदारसंघ वाढले आहेत. नव्याने प्रभाग रचनेनुसार मतदारसंघातील लोकसंख्या, मतदारसंख्या आणि नकाशा सादर करण्यात आला.

 

यावेळी प्रारुप रचनेची तपासणी करण्यात आली. तसेच प्रारुप रचना प्रसिद्ध करण्यासह विविध तांत्रिक अडचणींवर निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात आली. राज्य शासनाने जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढविण्याचा निर्णय घेत ला आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर तयार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सध्या 60 गट आहेत. वाढती लोकसंख्या आणि वाढलेले मतदार लक्षात घेता मतदारसंघ वाढले आहेत.

 

नव्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचे आता 68 मतदारसंघ निश्चित झाले आहेत. पंचायत समितीचे गण 120 आहेत. नव्या रचनेनुसार 136 गण होणार आहेत. कडेगाव आणि कवठेमहांकाळ तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यात जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here