राज्य शासनाच्या योजना घेवून सांगली जिल्ह्यातून धावल्या महाराष्ट्र व कोयना एक्सप्रेस राज्यात पाच एक्सप्रेस गाड्यांवरून राज्य शासनाच्या योजनांची प्रसिध्दी

0
3

 

सांगली : महाविकास आघाडी शासनाकडून राज्यात विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत व क्षेत्रिय ‍जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे विविध माध्यमांव्दारे जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. प्रथमच रेल्वे रॅपव्दारे शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मिरज व सांगली मार्गे धावणाऱ्या कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेसचा यात समावेश आहे.

रेल्वे डब्यांवर जाहिराती  रॅप  करण्याची संकल्पना राज्य शासनाने अवलंबली असून राज्यात दादर ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्सप्रेस, मुंबई ते नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, मुंबई ते लातूर लातूर एक्सप्रेस अशा एकूण पाच एक्सप्रेस रेल्वेगाड्यांवर शासनाच्या कल्याणकारी कामाच्या जाहिराती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये  सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या महाराष्ट्र व कोयना एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने राबवलेल्या राज्य शासनाच्या वतीने ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’या टॅग लाईन द्वारे लोकोपयोगी योजनांचा संदेश रेल्वे गाड्यांच्या डब्यावर देण्यात आला आहे. शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा यात समावेश आहे.  ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’हा संदेश देण्यात येत आहे.

कर्जमुक्ती.. चिंतामुक्त शेतकरी, माझी वसुंधरा, मोफत सातबारा आता दारी येणार.. ई-पीक पाहणी नोंदणीही करता येणार..  महिला सक्षमीकरण- कुटुंबातील महिलांच्या नावे घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्यांची सूट, कौशल्य विकास-..बेरोजगारांना रोजगार, विक्रमी लसीकरण.. कोरोनापासून संरक्षण, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखाची मुदत ठेव योजना, जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण, आपद्ग्रस्तांना मदत, कापूस खरेदीसाठी मदत.. आदी अनेक निर्णय व योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here