कुपवाड,संकेत टाइम्स : कुपवाड शरदनगरमधिल बेकायदेशीर भिशी सावकार ताब्यात करणारा बसवराज शिवय्या मठपती यास रोख ४१ हजार १५० रुपये तसेच होंडा अमेंज चारचाकी आणि कोरे बॉण्ड व कोरे चेकसह पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांना प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे सावकारी सेल व एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त सेलने कारवाई करत सावकार बसवराज शिवय्या मठपती यास जेरबंद केले.सावकार बसवराज शिवय्या मठपती यांने वार्षिक भिशी चालू करुन त्या भिशीचे आधारे लोकांना ४ टक्के व १० टक्के दराने पैसे देवुन मासिक व्याज स्विकारत होता.
तो त्यांच्या चारचाकी गाडीतुन बऱ्याच मध्यम वर्गीय मजुरांना मासिक व्याजाने पैसे देवुन त्यांचे पैसे भिशीतून वर्ग करुन स्वतः वापरत होता.बऱ्याच लोकांच्या कडून त्यांनी रुपये २० ते ३० हजार कर्ज देवून त्यांचेकडून दुप्पटीने व्याज गोळा करीत होता.पिडीत यांने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सावकारीच्या घरावर सोमवार दि. १४ फेंब्रुवारी २०२२ रोजी छापा टाकत त्यांचेकडुन रोख ४१ हजार १५० रुपये व होंडा अमेंज चारचाकी वाहन तसेच कोरे चेक व कोरे बॉण्ड असा ८ लाख ४१ हजार १५० रुपयांचा माल जप्त केला.याबाबत सावकारी कायद्यान्वये एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर ५८/२०२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडील प्रभारी अधिकारी अविनाश पाटील,सावकारी सेलचे पोलीस उपनिरीक्षक आर.एफ.मिरजे तसेच सेल मधील पोना मदुसदर पाथरवट,पोशि संदीप पाटील, पोउनि जठार, सपोफौ युवराज पाटील, सतिश माने, पोना/प्रताप पवार,मपोना अरुणा यादव, पोशि सुरज मुजावर यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.