छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कडक बंदोबस्त

0
जत : जत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्र्वारूढ पुतळ्यावरून जिल्हाधिकारी यांनी नियमावर बोट, सर्व त्या परवानग्या मिळवा मगच पुतळ्याची स्थापना करा,अशा सुचना सांगली येथील बैठकीत दिल्याने पुतळ्याचा स्थापना कार्यक्रम पुढे जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्र्वारूढ पुतळ्याचे जत शहरात आगमन झाले असलेतरी हा पूर्णाकृती ब्राॅन्झधातूचा अश्वारूढ पूतळा बसविण्यासाठी अडचणी उभ्या राहिल्या आहेत.राजकीय मतभेदही समोर आले आहेत.दोन्ही बाजूचा पुतळा बसविण्यास विरोध नाही मात्र वेगवेगळे म्हणणे असल्याने अडचणी वाढल्या आहेत.त्यात प्रशासनाकडूनही रितसर परवानगी घेऊनच पुतळा बसवावा,अशा सुचना दिल्या आहेत.शहरातील माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पेट्रोल पंपावर सध्या एका ट्रकमध्ये पुतळा ठेवण्यात आला आहे.
तेथे तणावाची स्थिती असल्याने जत पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.पोलीस निरिक्षक उदय डुबल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.रितसर परवानग्या मिळेपर्यत प्रशासन पुतळा ताब्यात घेणार काय याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जत शहरात आणण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा ठेवलेल्या जगताप पेट्रोल पंपावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.