संख : गुड्डापूर ता.जत येथे कर्नाटकच्या मंत्री सौ.शशिकलाताई आण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून कर्नाटक सरकारकडून मिळालेल्या पाच कोटीच्या निधीतून दानम्मादेवी देवस्थान परिसरात बांधण्यात येत असलेल्या दासोह बांधकामाचे भूमीपुजन समारंभ बुधवार ता.१६ फेंब्रुवारीला सकाळी ९.०० वाजता मंंत्री सौ.शशिकलाताई जोल्ले यांच्याहस्तते संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर स्वामीजी,खासदार आण्णासाहेब जोल्ले,खासदार संजयकाका पाटील,आमदार विक्रमसिंह सांवत आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
हाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रंध्दास्थान असलेले दानम्मादेवी देवी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत.कर्नाटकच्या मंत्री असलेल्या सौ.शशिकलाताई आण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून श्री.दानम्मादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे प्रसाद व्यवस्थेसाठी अन्नछत्रालय(दासोह भवन) चे बांधकामासाठी कर्नाटक सरकारकडून पाच कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक सरकारकडून या मंदिरासाठी सातत्याने मोठी मदत केली जात आहे.त्यामुळे भाविक निवासस्थाने,मंदिर परिसरातील बांधकामे,शिखरासह अनेक कामे ट्रस्टकडून करण्यात आली आहेत.जत तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून गुड्डापूरची ओळख आहे.
या कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन श्री.दानम्मादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.