वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित चव्हाण जम्मू काश्मीरमध्ये शहीद

0

सांगली  : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील  शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण, वय वर्षे २२ यांना वीरमरण आले.

         

Rate Card

शहीद रोमित चव्हाण १ राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये कार्यरत होते. ते सैन्य सेवेमध्ये गेली 5 वर्षापासून कार्यरत होते.  त्यांचे पार्थिव दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता पुणे येथे येणार असून शिगाव येथे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कार्यालयतर्फे देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.