दिग्विजय चव्हाण यांची जत तालुका तालिम संघाच्या उपाध्यक्षपदी निवड
जत,संकेत टाइम्स : डफळापूर पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांची जत तालुका तालिम संघाच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
जत तालुक्यातील कुस्ती जिंवत ठेवण्यासाठी तालुका तालिम संघ कार्यरत आहे.कोरोनामुळे यात्रा,ऊरूस होत नसल्याने कुस्ती मैदान होत नाहीत.परिणामी पैलावन मोठ्या अडचणीत आहे.त्या बळ देण्याचे काम नवे पदाधिकारी करणार आहेत.
भूतपूर्व कॉंग्रेस नेते असलेले स्व.सुनिलबापू चव्हाण यांनी पैलवान टिकले पाहिजेत यासाठी मोठी कुस्ती मैदानाचे आयोजन करून आपले कुस्ती प्रेम कायम ठेवले होते.त्यांच्याकडे अनेक पैलवान मदतीसाठी येत होते.सातत्याने बापूनी पैलवानाना मदत केली होती.
त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण हेही कुस्ती प्रेमी आहेत.त्याशिवाय त्यांनी पैलवानकी टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न चालविले आहे.तालिम संघाने त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी दिली आहे.
डफळापूर येथे लवकरचं जंगी कुस्ती मैदानचे आयोजन करणार
डफळापूर येथे कुस्तीची परपंरा आहे.अनेक पैलवान या परिसरात तयार झाले आहे.बापूनाही कुस्तीविषयी मोठी अस्ता होती.त्यांच्या पश्चात कुस्ती मैदानाची परंपरा आम्ही जपणार आहोत.लवकरचं डफळापूर येथे मोठे जंगी कुस्ती मैदान आयोजन करणार आहोत.त्याशिवाय नवे पैलवान तयार व्हावेत यासाठी कायमस्वरूपी राज्यस्तरीय कुस्ती केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
दिग्विजय चव्हाण
तालुका उपाध्यक्ष, कुस्ती तालिम संघ जत तालुका