रांगोळीतून जिवंत झाला चित्तथरारक इतिहास गोव्याच्या सुरेश छत्रे यांची रांगोळी प्रथम; शांतिनिकेतनमध्ये प्रदर्शन खुले

0
5
सांगली : महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची महती सांगणार्‍या अनेक प्रसंगांना रांगोळीतून जिवंत करायची करामत राज्यातील नामांकित रंगावलकारांनी केली. निमीत्त होते शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे आयोजित केलेल्या लोकोत्सवाचे. इतिहासातील अनेक चित्तथरारक प्रसंग या रांगोळ्यांमधून प्रकट झाले.

 

या स्पर्धेत गोव्याच्या सुरेश छत्रे यांनी रांगोळी प्रथम आली.महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत आणि लोककलांचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरामध्ये बहारदार लोकोत्सव सुरु आहे.

रांगोळी प्रदर्शन हे या लोकोत्सवाचे आकर्षण असते. ऐतिहासिक प्रसंग हा यावर्षीचा रांगोळीचा विषय होता. या स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातील नामांकित रंगावलीकार सहभागी झाले होते. बी.एस.पाटील आणि भारत गिते यांनी परीक्षण केले. नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक आणि लोकोत्सवचे मुख्य संयोजक गौतम पाटील, प्रमुख पाहूणे रंगावलीकार सचिन अवसरे यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. स्वागत प्रा. मधुकर कराळे यांनी केले.

रांगोळी स्पर्धेचा निकाल-
1 . सुरेश मलगोंडा छत्रे (अकिवाट)-  प्रथम क्रमांक.
2 . प्रमोद सदाशिव आर्वी (पुणे )- द्वितीय क्रमांक.
3 . भुमेश दामोदर नाईक ( गोवा )- तृतीय क्रमांक.
4 . प्रसादकुमार खंडेराव सुतार (कोल्हापूर )- उत्तेजनार्थ.
5 . किशोर शांताराम पांचाळ ( मुंबई )- उत्तेजनार्थ.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here