माऊली बाल रुग्णालयाकडून नेत्र,बालह्रदय,आरोग्य शिबिराचे रविवारी आयोजन

0
जत,संकेत टाइम्स : डॉ.नितीन पतंगे (बालरोगतज्ञ ) यांचे माऊली बालरुग्णालय (जत) व लायन्स नॅब नेत्र रुग्णालय (मिरज) व लिटल हार्टस् क्लिनीक (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने रवीवार २७ फेंब्रुवारी २०२२ ला सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भव्य मोफत नेत्ररोग व बालहृदय रोग,बालआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती माऊली बालरुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

 

यात वयोगट-नेत्ररोग तपासणी,सर्व वयोगट बालहृदयरोग व बालरोग,नवजात बालक ते १८ वर्षे या रुग्णाची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व प्राथमिक औषधोउपचार करण्यात येणार आहेत.
शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज उपस्थित राहणार आहेत.

 

 

शिबीरात नेत्ररोग- मोफत मोतीबिंदू व इतर नेत्ररोग व चष्मा नंबर काढून मिळेल.अत्यल्प सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा करुन मिळेल.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया,लहान मुलांच्या डोळ्यांच्या सर्व समस्या निदान व शस्रक्रिया,तिरळेपणा,दूष्टिदोष,काचबिंदू,मोतीबिंदू,लासरु,पापणी दोष निदान,नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
बालहृदयरोग- जन्मजात हृदयदोष असणाऱ्या बालकांची तपासणी व उपचार,

 

शिबीरातील लाभार्थीना 2D ECHO मध्ये ५० टक्के सवलत,बाळांच्या वजनवाढीसाठी औषधोपचार,महात्मा फुले व आयुष्यमान भारत,कर्नाटक आरोग्य योजना व RBSK आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध आहेत.

 

माऊली बालरुग्णालय जत,लायन्स नॅब नेत्र रुग्णालय मिरज,डॉ.श्रीकांत माने (बालहदयरोग तज्ञ)-लिटल हार्टस् क्लिनीक सांगली यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.पालकांसह मुलांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.नितिन पंतगे यांनी केले आहे.माऊली बालरुग्णालय,सावंत गल्ली,जत येथे हे शिबिर होणार आहे.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.