आमदार मोहनशेठ कदम यांच्या आमदार निधीतून जतला १ कोटीचा निधी

0
2
जत : विधानपरिषदेचे आमदार मोहनशेठ कदम यांच्या आमदार फंडातून जत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी 1 कोटींचा निधी मंजूर करून आणला.यासाठी जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी पाठपुरावा केला होता.

 

याअंतर्गत जत तालुक्यातील विविध गावांमध्ये रस्त्यांचे खडीकरण व मुरुमीकरण करणे, देवस्थान समोरील सभा मंडप बांधणे, पेविंग ब्लॉक बसवणे, सी.डी. वर्क करणे याप्रकारची अनेक कामे केली जाणार आहेत.

 

 

ग्रामविकासामध्ये पक्क्या रस्त्यांना खूप महत्व आहे. पक्के व परिपूर्ण रस्ते असतील तरच गावे शहराशी योग्य प्रकारे जोडली जाणार आहेत. तसेच अनेक गावांमध्ये ग्रामदैवताच्या समोर सभामंडप नसल्याने अनेक भाविक भक्तांना होत असणारा त्रास या विविध विकासकामांमुळे कमी होणार आहे,असल्याचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here