आता जत नगरपरिषदेच्या तयारीला लागा ; प्रकाश जमदाडे,मन्सूर खतीब

0
जत :  जत तालुक्यातील परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. जिल्हा बँकेत विद्यमान आमदारांचा पराभव झाला.अनेक सोसायटींवर राष्ट्रवादी भाजपने विजयश्री खेचून आणली आहे.जतची जनता सत्ताधाऱ्यांना कंटाळली आहे, तेव्हा कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात होणाऱ्या जत नगर परिषदेवर झेंडा फडकाविण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक प्रकाश जमदाडे, मन्सूर
खतीब यांनी केले आहे.

 

सोसायटीवर राष्ट्रवादी व भाजप युतीने एकहाती सत्ता स्थापन करत विजयाचा झेंडा फडकाविला आहे.जत सोसायटीतील विजयी उमेदवार जतचे उपनगराध्यक्ष आप्पासो पवार,माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी, स्वप्नील शिंदे, अचकनहळीचे माजी सरपंच प्रमोद सावंत, अजित शिंदे,बसाप्पा बेडगे, विठ्ठल पवार, हनुमंत गडदे, मनोहर सावंत, सुशिला शिंदे ,हुवाण्णा माळी, प्रकाश देवकुळे यांचा सत्कार प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब यांच्याहस्ते करण्यात आला.

 

Rate Card
यावेळी राष्ट्रवादीचे मंच्छिद्र वाघमोडे, जत पंचायत समिती सदस्य रामन्ना जिवणावर,नगरसेविका जयश्री मोटे, जगूनाना शिंदे, प्रकाश व्हनमाने उपस्थित होते. जत तालुक्यातील सर्वात जुनी सोसायटी म्हणून जत सोसायटी ओळखली जाते. ६८ वर्षांपूर्वी या सोसायटीची स्थापना झाली आहे.

 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जत सोसायटीला आर्थिक बळ देणार असल्याची ग्वाही जमदाडे व खतीब यांनी यावेळी नूतन संचालक व सभासदांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.