जतच्या डॉ.कोमल पवार यांचे कार्डियोलॉजी सुपर स्पेशालिस्ट परीक्षेत यश 

0
जत,संकेत टाइम्स : जत येथील माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सी.बी.पवार यांच्या कन्या डॉ.कोमल चन्नाप्पा पवार यांनी नुकतेच वैद्यकीय क्षेत्रातील (डी.एन.बी) कार्डियोलॉजी सुपर स्पेशालिस्ट (हृदयरोग विशेषज्ञ) या परीक्षेत चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे.पहिल्याच प्रयत्नात यश मिळविणाऱ्या डॉ.कोमल पवार जत
तालुक्यातील पहिल्या डॉक्टर आहेत.

 

वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर तज्ञाकरीता असलेली ही परीक्षा कोमलने जागतिक दर्जाच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर मुंबई येथून संपादन केले आहे. या पदवीने जत तालुक्याची मान उंचावली आहे.अशा प्रकारची पदवी संपादन करणारे जिल्हातील पहिलीच महिला आहे.तालुक्यातून सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Rate Card
डॉ.कोमल पवार हीचे प्राथमिक शिक्षण जत येथील बालमंदिर व माध्यमिक शिक्षण राजे रामराव विद्या मंदिर व कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेज येथे झाले, तदनंतर एम.बी. बी.एस ही पदवी के.जी  स्तेमैया मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे घेतली.तसेच एम.डी (जनरल मेडिसिन) ही पदवी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड येथे पूर्ण केली आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मानवतेच्या उदात्त दृष्टिकोनातून हेतूने कोरोना महामारीच्या काळात मुंबई येथे दहा हजारहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार व सेवा केली आहे.

 

डॉ.कोमल पवार यांना तिचे वडील माजी जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर डॉ. सी. बी. पवार , त्यांच्या आई डॉ. सौ अनिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय डॉ. शीतल पवार, डॉ.वैभव पवार, डॉ. योगेश राठोड,(क्रिटिकल केअर) यांचे मार्गदर्शन लाभले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.