पत्रकारांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या कडेगाव विटा बंद

0
4

 

कडेगाव : येथील पत्रकार सुरज जगताप यांनी प्रांत व तहसीलदारांना दिलेल्या वाळूतस्करी ची माहिती पोहोचून झालेल्या हल्ला प्रकरणात पत्रकार संरक्षण कायदा प्रमाणे अधिकाऱ्यांसह तस्करांवर गुन्हा दाखल करावा यासाठी सुरू असलेल्या पत्रकार यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत विटा आणि कडेगाव शहर शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केला आहे.

 

मराठी पत्रकार परिषदेचे संलग्न कडेगाव आणि खानापूर तालुका मराठी पत्रकार संघाने भुताच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्याला मोठा प्रतिसाद लाभत असून जिल्हाभरातून पत्रकार आंदोलन स्थळी येत आहेत. शिवसेना आमदार अनिल भाऊ बाबर, रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वैभव दादा पाटील, युवक नेते शंकर नाना मोहिते, तालुकाध्यक्ष ॲड बाबासाहेब मुळीक, शेकाप पक्षाचे नेते ॲड सुभाष पाटील, शेतकरी नेते भक्तराज ठिगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्यासह मान्यवरांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

 

 

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या व्यक्ति तसेच उद्युक्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला सर्व नेत्यांनी पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी दिली.
विटा आणि कडेगाव शहरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी, व्यापारी प्रतिनिधी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते, इतकेच नव्हे तर मेडिकल व्यावसायिकांनीही रविवारी सकाळी तीन तास आपले सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्याची घोषणा केली आहे.

 

जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप मोहिते, वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्येभादुल, सचिन भादुले, कडेगाव तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष हिराजी देशमुख जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अतुल जाधव, उपाध्यक्ष तुकाराम धायगुडे सचिव किरण जाधव विनायक विभुते, खानापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र काळे, कडेगाव तालुका अध्यक्ष. मोहन मोहिते, विनायक विभूते, स्वप्नील पवार,सुनिल सरोदे, शिवाजी मोहिते सागर गुरव, सचिन मोहिते, रोहित मोहिते, यांच्यासह दोन्ही तालुक्यातील पत्रकार धरणे स्थळावर पत्रकार जगताप यांच्यासह सहभागी झाले असून जिल्हाभरातील विविध संघटनांनी पत्रकारांच्या मागणीला पाठिंबा असल्याचे पत्र सुपूर्द केले आहे.

 

पोलिसांनी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फिर्याद दाखल करण्यासाठी सुरज जगताप यांचा घेतलेला जो जबाब आहे त्यानुसार अधिकारी आणि तस्करांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा कडेगाव आणि खानापूर तालुका पत्रकार संघाने दिला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here