कोसारी सोसायटीत रासप-राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पँनेलचा मोठा विजय | 13 पैंकी 13 जागा जिंकल्या

0
जत : जत तालुक्यात सोसायटी निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.कोसारी सोसायटीवर राष्ट्रवादी कॉग्रेस व राष्ट्रीय समाज पक्षाच्या पँनेलने आपला झेंडा फडकावित सोसायटी निवडणुकीत बाजी मारली.संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोसारी सोसायटीत रासप-राष्ट्रवादीने युतीने १३ च्या १३ जागा पटकावित बाजी मारली आहे. काँग्रेसला येथे पराभव स्विकारावा लागला आहे.

 

या निवडणूकीत दुर्गा माता ग्रामविकास परिवर्तन पँनेलचे नाना लिगाडे,संभाजी टेंगले,किसन टेंगले,प्रकाश साळे,उत्तम सुपने,आकाराम टेंगले,जालिंदर महारनूर,भागवत पडोळकर,शामराव महारनूर,सुवर्णा महारनूर, सविता शिंदे,मधुकर तोरवे, प्रल्हाद कुंभार हे विजयी झाले आहेत.

 

 

विजयानंतर रासप व राष्ट्रवादी समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली.मिरवणुकीनंतर नूतन संचालक व पॅनेल प्रमुख किसन टेंगले,संभाजी टेंगले, उत्तम महारनूर,महादेव चौगुले, परशुराम सांगोलकर, संभाजी संकपाळ,विकास महारनूर, विलास कदम,संभाजी संकपाळ, विकास महारनूर,नवनाथ टेंगले, बंडू चौगुले,सतीश चव्हाण, सचिन खडतरे यांचा सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.