सांगली : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने २७ फेब्रुवारी पासून पल्स पोलिओ अभियानाची सुरवात राज्यात झाली आहे. ० ते ५ वयोगटातील बालकांना त्यांच्या पालकांनी पल्स पोलिओ डोस पाजवावे असे आवाहन रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी केले.
शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, महामार्ग, खेडोपाडी, वाड्या वस्त्यात अशा विविध ठिकाणी आरोग्य सेवक-सेविका पल्स पोलिओ डोस लहान मुलांना पाजण्यासाठी भर उन्हात उभारलेले दिसतात.
हे अभियान पुढील ६ दिवस चालणार आहे. कोल्हापूर रोडवरील अंकली फाट्याजवळ खासगी नर्सिंग स्कूल मधील दोन तरुणी प्रज्ञा गेजगे, प्रीती गोपी भर उन्हात आपले काम करताना दिसले. दुपार पर्यंत त्यांनी जवळपास ५४ हून अधिक बालकांना पल्स पोलिओ डोस पाजला.
या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पालकांनी आपल्या बाळाला पल्स पोलिओ डोस पाजले. या ठिकाणी अमोल वेटम यांनी भेट देऊन सदर माहिती घेतली.