जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील गोरगरीब,निराधार, वेगवेगळ्या समाज्यातील कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे मुळे ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी, त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी “एक हात मदतीचा ” म्हणून जत तालुक्याचे कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवत,त्यांचे चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर सर आणि त्यांच्या सून व संस्थेच्या चेअरमन सौ. डॉ.वैशाली सनमडीकर यांनी काकांच्या स्मरणार्थ श्री.उमाजीराव सनमडिकर मेडिकल फाउंडेशन जत,च्या वतीने,’सामाजिक कृतज्ञता निधी ‘ म्हणून रोख रक्कम देण्याची सुरुवात केली आहे.
9 फेब्रुवारी 2022 रोजी जाडरबोबलाद गावातील महिला सुवर्णा परसाप्पा हेलवार आणि त्यांची मुलगी विद्या परसाप्पा हेलवार या दोघींचा ही विद्युत तारेचा करंट लागून दुर्देवी मृत्यू झाला होता.त्यांची मुले अनाथ झाली.त्यांच्या कुटूंबाला आर्थिक पाठबळ म्हणून रोख रक्कम स्वरूपात मदत करण्यात आली.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक पाटील सर,प्राचार्य वाघमारे सर,जाडरबोबलाद गावचे रामन्ना कोळी सावकार,महादेवाप्पा अंकलगी,बाबासाहेब काटे सर,लायप्पा काटे,दयानंद काटे,पांडुरंग कोळी,नागेश कांबळे,सिद्राम सायगाव,अप्पासाहेब सौदागर,राजेंद्र किट्टद सर,हे उपस्थित होते.
भविष्यात ही अशा आकस्मिक घटना प्रसंगी श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने मदत करत राहण्याचा व त्या अनाथ मुलांना संस्था शाखेमध्ये 12 पर्यंत शिक्षण मोफत देण्याचा मानस डाॅ.कैलास सनमडीकर यांनी व्यक्त केला.