शाळेत झालेल्या वादातून वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरला

0
525

वार्षिक समारंभावरून झालेल्या वादातून नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मांजरी भागातील एका शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी एका १४ वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मांजरीतील एका शाळेत नववीत तक्रारदार मुलगा शिकायला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला मुलगा त्याच्या आहे.

शाळेत समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. वार्षिव समारंभाच्या आयोजनावरून दोघांमध्ये वाद झाला.होता. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास मुलगा वर्गात बसला होता. त्या वेळी वर्गातील मुलगा पाठीमागून आला. त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. या घटनेत तो जखमी झाला. मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर वर्गात मुले घाबरली.

या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाने त्याला धमकावले. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलाला ताब्यात पेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक दादासाहेब रोकडे तपास करीत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here