उमदी सोसायटीत कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पँनेलचा मोठा विजय

0
बालगांव : उमदी सर्व सेवा सहकारी सोसायटी निवडणूकी मध्ये कॉग्रेसचे नेते निवृत्ती शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य अँड.चन्नाप्पा होर्तीकर यांच्या नेतृत्वाखालील कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पँनेलनेने तेरा पैंकी तेरा जागा जिंकत निर्विवाद यश मिळविले आहे.गेल्या 25 वर्षांपासून सोसायटी निवडणूक न होता बिनविरोध होत होती, मात्र यावेळी भाजपा विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत झाली होती.

 

या अटीतटीच्या लढाईत काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ग्रामदैवत वीर मलकारसिद्ध ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे.निवडणुकीचा निकाल हाती लागताच काँग्रेस राष्ट्रवादी- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला.

 

विजयी उमेदवार व कंसात पडलेली मते,राधिका गोपाळ माळी(४९२),संदिप गोविंद शेवाळे(४८६),सिद्राया लक्ष्मण शिंदे(४८५),शिवाप्पा गुंडाप्पा लोणी(४८३),महादेव चनबसाप्पा धुळगोंड(४६४)अपपाराया बाबूराव पाटील(४६३),महमंद गुलाब कलाल(४५५),धानाप्पा आमगोंडा कोरे(४५१),वहाब आप्पासो मुल्ला(५३४),मच्छिंद्र रामचंद्र सातपुते(५१३),गौडाप्पा आण्णाप्पा जालगेरी(५१९),सुगलाबाई चंद्राम आरकेरी(५२९),कस्तूराबाई मदगौंडा गौडगाई(४९०)असे विजयी उमेदवार आहेत.अगदी अटीतटीच्या लढाईत ग्रामदैवत वीर मलकारसिद्ध ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.
आतापर्यत केलेल्या कामाची पोहचपावती
 
आम्ही राजकारणपेक्षा विकास कामे करण्याला प्राधान्य देतो आहोत.लोंकाच्या सुख-दु:खासह गावात केलेल्या कामाची हा विजय पोहचपावती आहे.यापुढेही असाच विजयरथ कायम ठेऊ,सोसायटीत सभासदानी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू.
 
निवृत्ती शिंदे,पँनेल प्रमुख
 
 
उमदी (ता.जत)येथील सोसायटी निवडणूकीतील विजयानंतर जल्लोष करण्यात आला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.