बिळूर,संकेत टाइम्स : जत तालुक्यात म्हैसाळचे पाणी आल्यापासून बिळूर कालव्यातून पाणी देण्याची मागणी असलेल्या बिळूरमधील केसराळ तलावात यंदा म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या प्राथमिक स्वरूपात स्थानिक शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून तात्पुर्ता कँनॉल खुदाई सुरू केली आहे.त्याचा शुभारंभ नुकताच आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते झाला आहे.
सध्या कँनॉल पुर्ण असलेल्या डोनीपीर ते केसराळ तलाव असे पाणी नेहावे लागणार आहे.त्यासाठी काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहासाठी खुदाईची गरज होती.तेथे आता खुदाई सुरू आहे.द्राक्ष,बेदाणा शेतीचे हब म्हणून पुढे येत असलेल्या बिळूरमधील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना या तलावात पाणी येण्यामुळे मोठा फायदा होणार आहे.
आमदार सांवत यांनी पुढाकार घेत तात्पुर्ती सोय करून येथे पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे.
त्यांचे खुदाई कामाचा प्राथमिक स्वरूपात शुभारंभ झाला आहे. सध्या म्हैसाळ योजनेचे उन्हाळी अवर्तन सुरू आहे.पुढील पंधरवड्यात या तलावात पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे आ.सांवत यांनी सांगितले.
यावेळी,जि.प.सदस्य तथा DCC संचालक सरदार पाटील,धानम्मा दूध संघ संचालक रावसाहेब मंगसुळी, बाबा पाटील ,श्रीशैल पाटील,नाना पाटील बसवराज घेज्जी, मलिकार्जुन घेज्जी,संगप्पा पाटील,भैरप्पा माळास, शिवानंद धोडमाळ, महादेव धोडमनी,बसवराज जयगोंड,सागर लटे, विजय नाईक,गुरबसू कोटगोंड,श्रीशैल कोटगोंड,भिमु भविकट्टी,रामण्णा मुगोळखोड,लक्षण मगसुळी,तेजु मुत्तुर,दत्ता रुपनूर,कुमार धोडमाळ, कुमार नागराळे,चंदू मुगोळखोड,अण्णासो मुगोळखोड,इराप्पा कामगोंड,मानतेश गडीकर आदी शेतकरी उपस्थित होते.
बिळूरचा सर्व भाग पाण्याखाली आणू
बिळूरमधील शेतकरी मोठ्या प्रमाणत बागायत शेतीकडे वळत आहेत.येथे कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होण्याची गरज आहे.बिळूरसह पुढील जिरग्याळ,एंकूडी,गुगवाड,वज्रवाड,कोसारी,सिंदूर,उमराणीसह परिरात म्हैसाळचे पाणी पोहचविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.पुढील काही वर्षात आमचे शेतकरी नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात पुढे असतील..
श्री.विक्रमसिंह सांवत
आमदार,जत