सांगली : कुंडल ता. पलूस येथील 4 कोटी 53 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, राजेंद्र लाड, ऋुषीकेश लाड, उपसरपंच माणिकदादा पवार, यांची प्रमुख उपस्थीत होते.
उद्घाटन करण्यात आलेल्या कामांमध्ये कुंडल गावातील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे, कुंडल ते किर्लोसकरवाडी रस्ता सुधारणा करणे, कुंडल ते शेरे दुधोंडी रस्ता करणे, कुंडल ते माळवाडी रस्ता सुधारणा करणे, कुंडल ते हायस्कूलजवळ रस्ता डांबरीकरण करणे, कुंडल येथील पंचशील नगर येथे अंर्तत रस्ते सुधारणा करणे, कुंडल येथील स्मशानभूमी दुरुस्ती करणे, लाड मळा ते पलूस कॉलनी रस्ता, जाधव मळा ते पलूस कॉलनी, सावित्रीबाई फुले नगर, जगन्नाथ लाड ते खारगे वस्ती पाणंद रस्ता करणे इत्यादी कामांचा समावेश आहे.
कुंडल गावाच्या विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. कुंडलच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशिल राहीन असेही ते यावेळी म्हणाले.