राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई, माता रमाई यांचे स्रीशक्ती प्रेरणा स्मारक उभा करा : विक्रम ढोणे
जत,संकेत टाइम्स : आपल्या भारत देशाच्या, महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत महिलांनी अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आपला समाज पुढे जावा, म्हणून नगरपालिकेने विशेष प्रयत्न करावेत, म्हणून हे निवेदन महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर मुख्याधिकारी,नगराध्यक्षा,सर्व नगरसेवकांना देत विक्रम ढोणे यांनी मागणी केली
जत शहाराला ऐतिहासिक असे महत्व आहे, पण भौतिक विकासाच्या पातळीवर तालुका अपेक्षित प्रगती करू शकलेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगिण उन्नत्तीसाठी प्रेरणास्रोत बळकट करण्याची आवश्यकता आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याणकारी स्वराज्य उभारले. छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन करून दिशा दाखवणाऱ्या राजमाता जिजाऊंचे अनंत उपकार सर्वांवर आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्याचा वस्तूपाठ घालून दिला. सामान्य जनतेच्या हिताची धोरणे राबवली, तसेच संस्कृती संवर्धानाचे काम केले. क्रांजीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशातील महिलांना शिक्षणाचा रस्ता खुला झाला. महात्मा जोतिबा फुले यांच्याबरोबर त्यांनी केलेली कार्य अजरामर आहे.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रजा समाजाला राजा समाज बनविण्याचे काम केले आहे. त्यांना साथ देण्याचे कार्य रमाबाई आंबेडकर यांनी केले आहे. या महान स्रियांचे एकत्रित प्रेरणा स्मारक जतमध्ये उभे करून जतच्या वैभवात भर घालावी , अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे. हे स्मारक जत शहर आणि तालुक्याबरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे होईल असा विश्वासही विक्रम ढोणे यांनी व्यक्त केला