सोलापूर : बुलढाण्यात दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला जोराचा अपघात झाल्याने ५ भाविकाचा दुर्देवी मृत्यूची घटना घडली आहे. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.
खामगाव जालना महामार्गावर बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली. यात शेगावला देवदर्शनासाठी जाणाऱ्या 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींवर देऊळगाव राजा आणि जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.