बुलढाण्यात बोलेरो गाडीचा भिषण अपघात,५ भाविक ठार 

0

 

सोलापूर :   बुलढाण्यात दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला जोराचा अपघात झाल्याने ५ भाविकाचा दुर्देवी मृत्यूची घटना घडली  आहे. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.

 

 

खामगाव जालना महामार्गावर बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली. यात शेगावला देवदर्शनासाठी जाणाऱ्या 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींवर देऊळगाव राजा आणि जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

Rate Card

सोलापूर नंतर दुसरा भयान अपघातांने राज्य  पुरता हादरून गेले आहे. सोलापूरमध्ये पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला ट्रकनं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला होता. तर लगेच बुलढाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. त्यासोबतच परभणीच्या चारठाणा परिसरात एकाच दुचाकीवरुन पाचजणांना प्रवास करणं त्यांच्या जीवावर बेतलं आहे.सलग घटनेने भाविकात भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.