न्यायालय इमारतीसाठी निधी आणल़्याबद्दल आमदार सांवत यांचा सत्कार

0
जत,संकेत टाइम्स : जत येथील न्यायालय इमारतीसाठी ३१ कोटी ४९ लाख निधी मंजूर करून आणल्याबद्दल आमदार विक्रमसिंह सांवत यांचा तालुका बार असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला.

 

 

जत येथे नवी न्यायालय इमारत मंजूर करण्यासाठी आमदार सांवत यांनी पाठपुरावा केल्याने अखेर त्यामध्ये यश आल्यानंतर 31 कोटी 49 लाख रु. चा निधी मंजूर झाला आहे.

 

 

निधी मंजूर झाल्याने जत येथे न्यायालयाची लवकरच नवी व सुसज्ज अशी इमारत उभारली जाणार आहे. आता असलेली इमारत ही १०० वर्षे जुनी होती. सदर ठिकाणी दोन न्यायालये असल्यामुळे तसेच कर्मचारी, अधिकारी व वकील यांची संख्या मोठी असल्याने सध्याची इमारत खूपच अपुरी व अडचणीची ठरत होती.

 

लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाऊन इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार आहे,खऱ्या अर्थाने आमदार सांवत यांच्या प्रयत्नाला यश आले आहे, असे यावेळी जेष्ठ वकील पुजारी यांनी सांगितले.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.