जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी,पुलांसाठी व नवीन न्यायालय इमारत बांधकामासाठी ६२ कोटी ८४ लाख रु.चा निधी मंजुर झाला आहे अशी माहिती आ.विक्रमसिंह सावंत यांनी दिली.
आ.विक्रमसिंह सावंत यांनी दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्र राज्याच्या सन २०२२ -२३ साठीचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर झाला.या अर्थसंकल्पात जत तालुक्यासाठी ६२ कोटी.८४ लाख रु चा निधी मंजूर झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्गासाठी २९ कोटी ९४ लाख नाबार्ड मधून पुलांसाठी २ कोटी व नवीन न्यायालय इमारत बांधकामासाठी ३१ कोटी ४९ लाख इतका भरीव निधी मंजूर झाला आहे.रस्ते बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मिळालेल्या निधी मुळे मतदारसंघातील रस्ते मजबूत होणार आहेत.
जत तालुक्यातील राज्यमार्ग १६० संख तिकोंडी को.बोबलाद यासाठी २ कोटी ५०लाख,डफळापूर अनंतपुर प्रजीमा ६५ साठी ७ कोटी १२ लाख ५० हजार ,दरीकोनुर ते मुचंडी प्रजिमा ६९ साठी ४ कोटी २७ लाख ५० हजार ,वळसंग ते सोरडी प्रजिमा १४३ साठी १ कोटी ९९ लाख ५० हजार रु,दरीकोनुर प्रजिमा ७२ साठी २८ लाख ५० हजार ,सोरडी गावभाग प्रजीमा ६९ साठी २८ लाख ५० हजार,अक्कळवाडी गावातील लांबी प्रजीमा ७३ साठी २८ लाख ५० हजार,सिद्धनाथ ते सिद्धनाथ फाटा प्रजिमा ११० साठी २८ लाख ५० हजार ,वायफळ ते अचकळहळळी रामा १५६ साठी ३ कोटी ,सोन्याळ ते सोन्याळ फाटा रामा ३८५ साठी ३० लाख रु.निगडी ते येळवी रामा ३८५ साठी ३० लाख ,
करजगी ते बोर्गी प्रजिमा ७० साठी ९५ लाख ,तिप्पेहळळी ते कोसारी प्रजिमा १४२ साठी ३ कोटी ३२ लाख ५० हजार, उमदी ते सुसलाद प्रजिमा ७३ साठी ९५ लाख ,शेगाव कोसारी कुंभारी बेळूंखी प्रजीमा ६५ साठी २ कोटी ३७ लाख ५० हजार ,प्रतापूर गुळवंची वाळेखिंडी डोंगरगाव रस्ता प्रजीमा १०९ साठी १ कोटी ४२ लाख ५० हजार रु,नराळे फाटा ते घोलेश्वर प्रजीमा ७० साठी २८ लाख ५० हजार ,पांडोझरी गावाजवळील पूल बांधकाम करणे यासाठी २ कोटी रु.व जत येथील नवीन न्यायालय इमारत बांधकाम कामासाठी ३१ कोटी ४९ लाख इतका असा एकूण ६२ कोटी ८४ लाख रु चा अनिधी मंजूर झाला आहे.
मतदार संघातील रस्ते सुसज्ज असावेत तर निश्चितपणे वाहतूक वाढून मतदार संघाचा विकास होण्यास मदत होते.मतदारसंघातील जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न आहे.येत्या काही दिवसामध्ये मतदारसंघातील सर्वच रस्ते चांगले करण्यासाठी तसेच रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असे आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले.
तसेच जत तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास जत तालुक्यातील बागेवाडी,साळमळगेवाडी,गुगवाड ,निगडी बु,व शिंगणापूर या ग्रामपंचायतींना एकूण ७५ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.