सैनिक दरबार 12 एप्रिलला अडीअडचणीचे अर्ज 25 मार्च पर्यंत सादर करा

0
सांगली :  सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व शहीद जवानांचे अवलंबित यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सैनिक दरबार आयोजित करण्यात येतो. एप्रिल 2022 महिन्यातील सैनिक दरबार दि. 12 एप्रिल रोजी नियोजित आहे. ज्या सैनिक, विधवांच्या अडीअडचणी स्थानिक प्रशासनाकडे प्रलंबित आहेत व ते त्यांच्या अडचणी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष मांडू इच्छितात त्यांनी सर्व कागदपत्रासह अर्ज दि. 25 मार्च 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त) यांनी केले आहे.

 

 

प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यकतेनुसार ते सैनिक दरबारामध्ये जिल्हाधिकारी यांच्या विचारार्थ सादर करण्यात येतील. अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. ढोले यांनी केले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.