कांदेपुराण | फायदे,औषधी गुणधर्म

0
कांदा हा त्याच्या तिखटसर चवीमुळे अनेक भाज्यांमध्ये व स्वादिष्ट नाष्टय़ांमध्ये आवश्यक घटक म्हणून वापरला जातो. कांदा वापरल्यामुळे खाद्यपदार्थ चविष्ट तर होतोच, पण त्याचबरोबर त्या पदार्थाचे पोषणमूल्यही वाढते. कांद्याला हिंदीत प्याज, इंग्रजीमध्ये ओनियन, संस्कृतमध्ये कंदर्प किंवा पलांडू, लॅटिनमध्ये एलिअम सेपा असे म्हणतात व तो लिलीएसी या कुळातील आहे. आहारशास्त्राबरोबरच आयुर्वेदशास्त्रात कांद्याचे औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत. सपाट, गोलाकार, लंबगोलाकार असे कांद्याचे आकारानुसार अनेक प्रकार आहेत, तर जंगली कांदा आणि रानकांदा असे त्याचे स्थानानुसार प्रकार आहेत. तर त्याच्या रंगानुसार लाल कांदा व पांढरा कांदा हेही प्रकार आहेत.

Rate Card
कांदा हा तिखट अग्निदीपक, रुचकर कफोत्सारक, उत्तेजक, मूत्रल, कामोद्दीपक असा बहुगुणी आहे. कांद्यात कॅल्शिअम, अ‍ॅल्युमिन, लिग्नीन आणि अ, ब, क जीवनसत्त्व, गंधक, फॉस्फोरिक आम्ल, तंतूमय पदार्थ, स्निग्धता असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते; परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. भारतातील अनेक भागात रोजच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा उपयोग होतो. तसेच तोंडी लावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो. याची भाजीपण करतात. कांद्याच्या पातीचा झुणका पण होतो.
कांदा हे एक अतिशय बहुगुणी, बहुमोली कंदमूळ आहे. आपल्या जेवणात तर तो नेहमी असतोच, पण राजकारणातही तो गाजतो. केवळ कांद्यामुळे काही राज्यांची सरकारं उलथवली गेल्याची उदाहरणं जुनी नाहीत. कांदा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे. तो जेवणाची लज्जत वाढवतो. कांद्याशिवाय मिसळीची कल्पनाच करता येत नाही. कांदा भजी, कांदे पोहे वगैरेची नुसती नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं. मात्र, कांदा हा फक्त खाण्याचा पदार्थ नाही. त्याचे अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे कांदा विविध प्रकारे वापरता येतो. हे केवळ संकलन असून सर्वसाधारण गुणधर्म दिले आहेत. औषध म्हणून वापरताना तज्ज्ञांकडून सल्ला घेऊनच वापरावे. कांदा तळून त्यात जिरे व साखर घालून खाल्याने उन्हाचा त्रास बाधत नाही.
मार लागणा-या जखमेच्या सुजेवर – कांद्याच्या 2 फोडी कराव्या, त्यावर हळद टाकावी व विस्तवावर ठेवून त्याला शिजवावे. खिळा, काटा, काच रुतून झालेल्या जखमेवर किंवा इतर ठेच लागून लागलेल्या मारावर, दुखण्यावर कांदा बांधावा. 3 दिवसात आराम पडेल.
बेशुद्ध पडणे – कोणत्याही कारणाने बेशुद्ध पडलेल्या माणसाला कांदा फोडून चावायला दिल्यास, मनुष्य शद्धीवर येतो. दगडाने किंवा हाताने कांदा फोडून नाकाजवळ धरावा. उन्हाळी वगैरे उन्हाळ्यामधे नेहमी होतात. कांदा खाण्यामधे वापरल्याने त्यापासून बचाव होतो.1-2 कांदे जवळ ठेवून उन्हात फिरले तरी उन्हाचा फार त्रास होत नाही. पोटात कृमी झाले, असे वाटल्यास कांद्याचा रस आणि वावडिंगाचे चूर्ण एकत्र मिळवून दिवसातून 3 वेळा घेतल्यास कृमी मरून ते बाहेर निघतील. प्रदर व प्रमेह या विकारात कांद्याच्या रसाबरोबर मध सकाळ-संध्याकाळ घेतल्याने फायदा होतो. कांद्याचा रस 3-3 तासाच्या अंतराने 1-1 चमचा दिल्यास, फ्ल्यूमध्ये चांगला फायदा होतो. मुलांच्या आकडीवर कांदा फोडून त्याचा वास द्यावा. लहान मुलास मोडशी व जंत झाल्यास, कांद्याचा रस द्यावा.
डोळे खाजवल्यास – कांद्याच्या रसात खडीसाखर उगाळून रात्री झोपताना डोळ्यास लावावी.
कावीळ – थोडा कांदा, थोडा गूळ, तेवढीच हळद टाकून रात्री झोपताना द्यावे.
डोळे आल्यास – डोळ्यात कांद्याचा रस एक थेंब टाकावा. तंबाखू खाण्यामूळे चक्कर आली व कासावीस वाटले, तर त्यास कांद्याचा रस पाजावा.
मूळव्याधीवर – साखर, तूप व थोडा कांद्याचा रस मिळवून द्यावा.
हागवणीवर – कांदा कापून बारीक करावा व पाण्यामधे स्वच्छ धुऊन घ्यावा. गाईच्या ताज्या दह्याबरोबर खावे म्हणजे हगवणीवर आराम पडतो.
फोडाचे दुखणे – कांद्याचा ठेचा करून त्याला गरम तव्यावर तापवून तूपामध्ये परतून घ्यावे, नंतर त्या लगद्याला फोडावर बांधावे. त्यामुळे दुखणे कमी होऊन आराम वाटेल. उचकी, डोके दुखणे व झोप न येणे या विकारावर कांद्याला चिरून किंवा हाताने फोडून त्याचा वास द्यावा. त्यामुळे आराम वाटेल.
सर्दी-पडसे – झोपेचे वेळी 1 कांदा फोडून त्याचा वास द्यावा व एखादा कांदा खाऊन टाकावा. त्यामुळे सर्दीवर फायदा होतो. तसेच लहान मुलांना कांद्याचा रस चमचाभर पाजल्यास, खोकल्यावरही फायदा होतो.

डाळ-कांदा

 

साहित्य : तासभर भिजवलेली 1/2 वाटी तुरडाळ, पोह्यांसाठी चिरतो तसा लांब चिरलेला 1 मोठा कांदा, 3 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या बारिक चिरलेल्या, थोडसं किसलेलं अद्रक, मोहरी, जिरं, तेल, तिखट, मीठ, हळद, एव्हरेस्ट चिकन, मसाला, सांभार/कोथिंबीर.
कृती : तेल तापल्यावर त्यात मोहरी-जि-याची फोडणी द्यावी. मग त्यात कांदा + मिरची + लसूण + अद्रक टाकावे. * कांदा लालसर झाल्यावर त्यात पाऊण चमचा तिखट + मीठ + हळद टाकावे.* सर्व परतवल्यावर त्यात डाळ टाकावी. पाऊण वाटी पाणी टाकून त्यावर झाकण ठेवावे. * शेवटी गॅस बंद करून पाव चमचा चिकन मसाला आणि सांभार टाकून जरा वेळ भाजी झाकून ठेवावी. यात गोडलिंबाची पान टाकू शकतो. टाकताना जराशी चुरगाळून टाकावी म्हणजे त्याचा फ्लेवर संपूर्ण भाजीला लागण्यासाठी मदत होते. टोमॅटोसुद्धा टाकू शकतो, पण अख्खा टाकू नये. साखर टाकायची आवश्यकता नाही. गोडाची आवश्यकता कांदा पूर्ण करतो. तरीही राहवलं नाहीच कुणाला, तर अगदी थोडी टाकावी.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.