उमदी,संकेत टाइम्स : सोनलगी (ता. जत) तेथे किरकोळ कारणातून वयोवृध्द वडिलाचा मुलानेच खून केल्याची घटना घडली आहे. शिवाप्पा चंद्राम पुजारी (वय 70) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी पहाटे घडली.याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीसांनी संशयित मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी (वय 32) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,पुजारी पिता-पुत्रात सतत वाद होत होता. बुधवारी रात्री शिवाप्पा पुजारी आणि त्यांचा मुलगा मल्लिकार्जुन यांच्यात पुन्हा वाद झाला. तो गावातील काहीं जेष्ठ मंडळीनी मिटविण्याचा प्रयत्न केला होता.तरी रात्री दोघांमध्ये वाद सुरू होता.रात्री उशिरापर्यत सुरू असलेल्या वादाने गंभीर रूप घेतले.
पहाटे मुलगा मल्लिकार्जुन याने शिवाप्पा यांनी वडील शिवाप्पा यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे ते घराच्या बाजूच्या असलेल्या पत्र्यावर पडले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट दिली. नवले यांनी पोलिसांना कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या.