श्रीमती तानूबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज येथे झालेल्या जिल्हास्तरिय वक्तृत्व स्पर्धेमध्ये गुड्डापूर (ता.जत) येथील पृथ्वी प्रशांतकुमार शिवनगी याने द्वितीय क्रमांक पटकवला आहे.
पहिली ते चौथी पर्यंतच्या लहान गटामध्ये एकूण 120 स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. त्यामध्ये श्री.दानेश्वरी न्यू इंग्लिश स्कूल गुड्डापुर या शाळेतील विद्यार्थी पृथ्वी प्रशांतकुमार शिवनगी याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ मिळावे, शालेय शिक्षणापासूनच त्यांच्यातल्या वक्तृत्व कला जोपासल्या जाव्यात.ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढावा.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा,यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक तसेच अभिषेक कनशेटी, आशिष कनशेटी, शुभम कनशेटी, प्रिती शिवनगी आणि अनिल कनशेटी आदी उपस्थित होते.
मिरज : येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.