आमदारांनी म्हाडाचे घर न स्वीकारण्याचे पत्रक शासनाला द्यावे ! ; संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

0
जत,संकेत टाइम्स : कोट्याधीश आमदारांना म्हाडाचे घर दिलेल्या निर्णयामुळे तो निर्णय तात्काळ रद्द करून देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटूंबाला व कोरोनाच्या संकटात विविध शासकीय सेवा बजावताना कोरोनामध्ये मरण पावलेल्या अधिकारी कर्मचारी तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला घरे देण्यात यावे व आमदारांनी म्हाडाचे घर न स्वीकारण्याचे पत्रक तात्काळ शासनाला द्यावे, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड सांगलीच्या वतीने ईमेल द्वारे मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.

 

 

निवेदनात म्हटले आहे की, ग्रहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच आमदारांना मुंबईत म्हाडाची घर देणार असल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय चुकीचा असल्याने हाच निर्णय देशासाठी सीमेवर सैनिकांनी बलिदान दिलेल्या कुटूंबासाठी व आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबासाठी व नुकतेच कोरोनाच्या संकटात अनेक जण शासकीय सेवा बजावताना अधिकारी कर्मचारी कोरोना हा आजार कर्तव्य बजावताना ओढून घेतले व मयत झाले अशा समाजाप्रती आदर्श ठरले असलेल्याना वगळून धनदांडगे असलेल्या आमदारांना म्हाडाचे घर देण्याचा निर्णय चुकीचा आहे.

 

एडियर संस्थेच्या अहवालानुसार  राज्यातील विधान सभेतील तीनशे आमदारापैंकी 266 आमदार कोट्याधीश आहेत.त्यांना मुबईतील गोरेगाव परिसरात म्हाडाचे घर कायमस्वरूपी मिळणार आहेत. हा निर्णय म्हणजे स्वार्थीपणा झाला असल्याचे दिसून येते.राज्यभरामध्ये म्हाडाचे घर मिळण्यासाठी लाखो अर्ज येतात परंतु सर्वसामान्यांचा विचार केला गेला नाही.राज्यामध्ये विधान सभेचे 288 आमदार आहेत तर विधान परिषदेचे 78 आमदार 2 आहेत.एकूण जवळपास 366 आमदारा पैकी मुंबईतील आमदार वगळता बाकी अनेक कोट्याधीश आमदारांना म्हाडाचे घर मिळणार असल्याने हा निर्णय तात्काळ शासनाने मागे घ्यावा,अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी दिले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.