प्राणघातक हल्ला,जाडरबोबलादचे तिघे गंभीर जखमी

0
4
जत,संकेत टाइम्स : मंगळवेढा- जत  तालुक्याच्या सिमेवरील माराेळी येथील वनक्षेत्र परिसरात जाडरबाेबलाद (ता. जत) येथील दाेघा भावांसह तिघांवर सशस्त्र हल्ला करत धारदार शस्ञाने वार करीत हात-पाय ताेडण्यात आल्याचा भयानक प्रकार रविवारी सायकांळी घडला आहे.

 

वनविभागाच्या झाडीत दबा धरून बसलेल्या हल्लेखाेरांनी भावकीतील अंतर्गत वाद व शेतजमिनीवरून सुरू असलेल्या संघर्षातून हा भयानक हल्ला केल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 

हल्यात विठ्ठल रामचंद्र बरूर, दयानंद मल्लेशप्पा बरूर व महादेव रामचंद्र बरूर (तिघेही, रा. जाडरबाेबलाद) जखमी झाले आहेत. त्यांच्या जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मंगळवेढा तालुक्यातील माराेळी व जत तालुक्यातील जाडरबाेबलाद दरम्यान वन वनक्षेत्र आहे.गर्द झाडी असल्याने नेहमीच हा परिसर निर्जन असताे. जाडरबाेबलाद येथील बरुर कुंटुबियामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविवारी विठ्ठल बरूर, दयानंद बरूर व महादेव बरूर हे तिघे एकाच दुचाकींवरून जाडरबोबलाद जवळच असणाऱ्या नंदूर येथे एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले हाेते.

 

अंत्यविधी आटाेपून परत येत असताना वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांना अडवून तलवारीने हल्ला चढविला. त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उमदी व मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलीस ठाण्यात याची नोंद नव्हती.

 

दरम्यान मागील काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांच्यात शेतात नांगर लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या कारणावरूनच ही घटना घडली असावी असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here