बनाळीतील बनशंकरी मंदिर परिसरात म्हैसाळचे पाणी सोडा 

0
आंवढी (हंणमत बाबर ): बनाळी परिसरातील श्री. बनशंकरी मंदिर परिसरात म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी सोडावे,अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,म्हैशाळ योजनेच्या मुख्य कालव्यातून बनशंकरी तलावातून बंदिस्त पाईपलाईन ने पाणी श्री बनशंकरी मंदिर परिसरात सोडलेस सुमारे ३५० एकर शेतीस सोप्या पद्धतीने पाणी मिळू शकते. शिवाय पाईप लाईन ही फक्त १ किमी करावी लागते.

 

यामुळे कमी खर्चामध्ये परिसरातील माळी मळा,पाणी पुरवठा विहीर ,पाटील मळा, बारा बिघे व गवानपट्टी मळा हि शेती पाण्याखाली येऊ शकते.त्याचबरोबर शेगाव परिसरातील ३ छोटे बंधारे भरून घेता येतात. तरी मुख्य कालवा ते बनशंकरी मंदिर बंदिस्त पाईप लाईन टाकून शेतकऱ्यांना योजनेतून पाणी मिळावे,यासाठी आपण प्रयत्न करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

 

यावेळी बाळासाहेब सांवत,दाजीराम जाधव,रामचंद्र सांवत, साहेबराव सांवत, भारत सांवत,अविनाश सांवत,मुरलीधर सावंत,तानाजी सांवत,अविनाश सांवत,श्री.ज्ञानेश्वर आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.
नकाशासह निवेदन
या परिसरातील मुख्य कँनॉलमधून कसे पाणी येऊ शकते,कोठून कोणत्या सर्व्हे नंबरमधून बंधिस्त पाईपलाईन टाकता येते,यांचा वस्तुनिष्ठ नकाशा यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांनी सादर केला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.