संख,संकेत टाइम्स : गोंधळेवाडी ता.जत येथील सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी कॉग्रेसचे साहेबराव महादेव टोणे यांची तर व्हा.चेअरमनपदी विठ्ठल सुभाना दोरकर यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फत्तू शेख व सचिव मल्लू बिराजदार यांनी काम पाहिले.
संख मधून सोसायटी गोंधळेवाडी येथे स्वतंत्र झाल्यापासून या सोसायटीवर माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव टोणे यांच्या गटाचे वर्चस्व आहे.
नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीतही राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत साहेबराव टोणे यांच्या नेतृत्वाखालील पँनेलने १३ पैंकी १३ जागा जिंकत मोठे यश संपादन केले आहे.या निवडणूकीत चेअरमन साहेबराव टोणे यांच्यासह
व्हा.चेअरमन सुभाना दोरकर,संचालक म्हणून जायाप्पा खोत(महाराज),
सुखदेव करांडे,महादेव नरळे,विलास गळवे,निंगाप्पा टोणे,चंद्राबाई करांडे,निलाव्वा पांढरे,मारूती खोत,तुकाराम खोत,मधुकर मोरे,अशोक चव्हाण हे विजयी झाले आहेत.
निवडणूकीतील विजयासाठी बाळासाहेब करांडे,मऱ्याप्पा नरळे,पल्हाद नरळे,एकनाथ नरळे,दऱ्याप्पा खोत,सिध्दू गळवे,खंडू गळवे,दऱ्याप्पा खैरावकर,राजू करांडे,चंद्रशेखर करांडे,आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आहेत.दरम्यान जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चेअरमन साहेबराव टोणे व त्यांच्या टिमचा तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्याहस्ते जत येथे सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोसायटीचा नावलौकिक मिळवू
सोसायटीची वसूली बरोबर शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागेल,अशा पध्दतीने कारभार करू,दुष्काळ,पाणी टंचाईमुळे शेतकरी अडचणीत आहेत.त्यांना स्तर उंचावले,यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू.साहेबराव टोणेनुतन चेअरमन





