युवा नेतृत्व काळाची गरज ; तुकाराम बाबा महाराज ★ संखमध्ये भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

0
4

 

 

★ मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून स्पर्धेचे आयोजन- आर. के. पाटील
★ साहिल पाटील यांच्या २१ व्या वाढदिवसानिमित्य मान्यवरांच्या शुभेच्छा

फोटो/ संख-जी. आर. पाटील चषक- २०२२ चा शुभारंभ करताना , सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी पाटील. यावेळी जत पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज आदी

जत, संकेत टाइम्स: आजचे युग हे संगणकाचे युग आहे. या युगात कल्पना शक्तीला गवसणी घालण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे. भविष्यातील पिढी जर अंधश्रद्धामुक्त करायची असेल तर प्रत्येक क्षेत्रात युवा वर्गाला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. युवा नेतृत्व काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

जत पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील यांचे नातू, जी. आर. पाटील यांचे चिरंजीव युवा नेते साहिल पाटील यांच्या २१ व्या वाढदिवसानिमित्य
सात एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन विविध स्पर्धा व सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते साहिल गुरूबसव पाटील यांच्या २१ व्या वाढदिवसानिमित्य शुक्रवारी जी. आर. पाटील चषक- २०२२ भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावावरून तुकाराम बाबा महाराज बोलत होते.
जी. आर. पाटील चषक- २०२२ चा शुभारंभ जत पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ. रवी मेत्री, श्रीशैल बिरादार, सोमशेखर जमशेट्टी, डॉ. संभाजी जाधव, अमोघसिद्ध पांढरे, प्रवीण अवरादी, परमेश्वर व्हनमराठे, किरण पाटील, बी. आर. पवार, विजय बिरादार, प्रसाद पुजारी, श्रीशैल पुजारी, आप्पा थोरात, अशोक पुजारी आदी उपस्थित होते.

माजी सभापती आर. के. पाटील म्हणाले, संख सारख्या ग्रामीण भागात मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून स्पर्धा आयोजित केल्याचे सांगत या स्पर्धेतील विजेत्यांना जी. आर. पाटील चषक- २०२२ हा चषक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम बक्षीस एक लाख ११ हजार , दुसरे बक्षीस ५५ हजार, तिसरे २२ हजार तर चौथे बक्षीस ११ हजार राहणार असल्याचे संगितले.

 

 संख-जी. आर. पाटील चषक- २०२२ चा शुभारंभ करताना , सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी पाटील. यावेळी जत पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज आदी.
संख-जी. आर. पाटील चषक- २०२२ चा शुभारंभ करताना , सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी पाटील. यावेळी जत पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज आदी.

 

 

तम्मणगौडा रवी पाटील म्हणाले, ग्रामीण भागात आज तरुणाईत खेळाची आवड कमी झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. मैदानी खेळाची आवड वाढावी यासाठी शाळा, महाविद्यालये यांनी विविध स्पर्धा आयोजित कराव्यात असे आवाहन केले.

पाच दिवस चालणारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री गुरुबसव कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, जी. एन. बॉयज ग्रुप, जय भवानी नवरात्रौतसव तरुण मंडळ, ओम ग्रुप , जय भीम तरुण मंडळ, महर्षी वाल्मिकी तरुण मंडळाकचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here