पोलीस दलाच्या अत्याधुनिक कार्यपध्दतीमुळे जनमानसात पोलीसांच्याप्रती विश्वासहर्ता ; पालकमंत्री जयंत पाटील | जत व तासगाव शहरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वीत

0

 

– जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 35 चारचाकी व 58 दुचाकी वाहने पोलीस दलात दाखल

 

सांगली : सांगली पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कार्यपध्दतीमुळे गुन्ह्याचे प्रमाण कमी होत आहे. जनमानसात पोलीसांच्या प्रती विश्वासहर्ता निर्माण होत आहे. तसेच पोलीस व त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्यासाठी पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे पोलीसांची कार्यक्षमता वाढत आहे. शिराळा पोलीस स्टेशनला आयएसओ नामांकित करुन देशात 7 वा क्रमांक पटकविला आहे. याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख व सांगली पोलीस दलाचे अभिनंदन, नागरिकांची सुरक्षितता ही महत्वाची असून पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आणखीन निधीसाठी पाठपुरावा करु, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

 

पोलिस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवरील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलिस दलासाठी अद्ययावत वाहने आणि सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यंवशी, आमदार मोहन कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुन्हा पोलीस तात्काळ पोहचले पाहिजेत यासाठी सांगली, मिरज व कुपवाड शहरासाठी काही नाविन्यपुर्ण कल्पना राबविता येईल यामध्ये मोटरसायकलवरुन फिरते बीट मार्शल किंवा बिट अंमलदार यांची नि काययुक्ती करता येईल का? याबाबत पोलीसांनी अभ्यास करावा, जेणे करुन गुन्हेगाराला तात्काळ अटक करता येईल किंवा गुन्ह्यावर आळा घातला येईल, अशी सूचना देऊन पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील बहुतांशी शहरे ही सीसीटीव्हीच्या कक्षेत आली आहेत. महानगरपालिका क्षेत्रामध्ये यापुर्वीच सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. आज जत आणि तासगाव शहरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसविणे शक्य होणार आहे. सांगली पोलीस दलासाठी आज जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 35 चार चाकी व 58 दुचाकी वाहने प्रधान करण्यात येत आहेत. त्यामुळे सांगली पोलीस प्रशासन गतीमान होणार आहे. लवकरच नविन पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या इमारतीचे काम पुर्ण होईल. त्यामुळे सांगली पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या नवनवीन संकल्पनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे.

 

Rate Card

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण ही संकल्पना राबविण्यात येत असून त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती पुढाकार घेत आहेत. माझी शाळा आदर्श शाळा यासाठी आतापर्यंत सुमारे अडीच कोटी रुपयांची लोकवर्गणी संकलित झाली आहे. अजूनही लोकांचा सहभाग वाढेल आणि मोठा निधी या शाळांच्या सुधारणांसाठी संकलित होईल. तसेच मला खात्री आहे की आरोग्याची सेवा सुधारण्यासाठीही अशाच प्रकारचे काम होईल. लोकांचे समाधान होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत.

याप्रसंगी पालकमंत्री जयंत पाटील पोलीस दलाकडून सुरु करण्यात आलेल्या 112 या हेल्पलाईन क्रमांकावर नमुना स्वरुपात स्वत: दूरध्वनी करुन तक्रार नोंदविली यावेळी पोलीस विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या वेळे आधीच पोलीस या ठिकाणी हजर झाले याबद्दल पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पोलीस दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी कॅन्सर प्रतिबंधक लसचे वाटप करण्यात आले व विशेष प्राविन्य मिळविलेल्या पोलीस पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.